घरमहाराष्ट्रतर, मेट्रोचे काम बंद पडणार - आशा धायगुडे-शेंडगे

तर, मेट्रोचे काम बंद पडणार – आशा धायगुडे-शेंडगे

Subscribe

मेट्रो स्थानकामुळे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकला जाणार आहे. त्यामुळे मेट्रो आराखडा बदलण्याची विनंती धनगर महासंघाने केली आहे. अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुणे महामेट्रोतर्फे बांधण्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनमुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्याची मागणी धनगर महासंघाने केली आहे. अन्यथा येत्या सोमवारपासून (दि.१९) मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी दिली आहे.

हेही वाचा – दारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये पसरवली बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये गोंधळ

- Advertisement -

काय आहे निवेदन?

श्रीमंत मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव कमिटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी मिळून पुणे मेट्रो कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, पुणे, मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये दापोडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत काम सुरू आहे. पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्यात यावा, असे निवेदात सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – दिल्लीत माकडांनाही गारेगार मेट्रोची हौस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -