घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी - चंद्रकांत पाटील

धनंजय मुंडे प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी – चंद्रकांत पाटील

Subscribe

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून घुमजाव का झाले ? हे कळत नाहीए. खर तर शरद पवार हे संपुर्ण प्रकरणात राजीनामा घेतील असे वाटले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा मात्र भ्रमनिरास झाल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपने काही तासातच आपली भूमिका मांडली होती. या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून किंवा सीबीआय चौकशी व्हायला हवी असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपने तातडीने या संपुर्ण प्रकरणात आपली भूमिका वेळीच स्पष्ट केली. त्यामुळे भाजपकडून कोणतीही दुटप्पी भूमिका या प्रकरणात घेण्यात आलेली नाही. भाजपने या संपुर्ण प्रकरणात एकच भूमिका मांडली आहे. येत्या सोमवारी राज्यातील जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करूणा शर्मा यांच्यासोबतचे नाते स्पष्ट केले. हा धनंजय मुंडे यांचा चांगुलपणा असला तरीही त्यांची समाजातील वागणुक चुकीची असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षाचे मोठे नेते म्हणून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा मागून घेणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र शरद पवार यांनी भ्रमनिरास केल्याचे त्यांनी सांगितले. पवारांनी एनवेळी का घुमजाव केला हे माहित नाही. धनंजय मुंडे यांनी संवेदनशीलता दाखवत राजीनामा देण्याची गरज होती असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेचे उदाहरण दिले.

- Advertisement -

आम्ही सोमवारपासून आंदोलन सर्व कलेक्टर, तहसीलदार कचेरीसमोर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी करणारे आंदोलन करणार आहोत. शिवाय उद्धवजींच्या नावाने निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने आणखी प्रकरणांची चर्चा होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचेही नाव घेतले. लग्न न होता नात्यात राहणे यावर येत्या काळात आणखी चर्चा होणारच आहे असे ते म्हणाले. या संपुर्ण प्रकरणात कोणीही जनहित याचिका दाखल करू शकतो, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -