घरमहाराष्ट्रमोदी सरकारची जनतेच्या पैशावर जाहिरातबाजी - अजितदादा पवार

मोदी सरकारची जनतेच्या पैशावर जाहिरातबाजी – अजितदादा पवार

Subscribe

मोदी सरकार जनतेचा पैसा जाहिरातबाजी करण्यासाठी उधळपट्टी करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 'निर्धार परिवर्तन' यात्रेत दरम्यान केला आहे.

हे सरकार केवळ जाहिरात बाजी करतं. कामाचा मात्रा काही पत्ता नाही अशी टिका नेहमीच विरोधकांकडून केली जात असताना पुन्हा एकदा मोदी सरकरावर टीका करण्यात आली आहे. ‘जनतेनी भरलेल्या टॅक्सचा पैसा भाजप सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे, एवढ्या पैश्यात मोठमोठी विकासकामे होऊ शकतात. भाजपला खोट्या जाहिराती देऊन निव्वळ प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे’, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ‘निर्धार परिवर्तन’ यात्रेत ते जाहीर सभेत बोलत होते.

मोदी सरकारमुळे शेतकरी करतात आत्महत्या

या सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही परंतु त्यांच्या घोषणा देण्याचं काम सुरुच आहे. गरीब माणून अजून गरीब होत चालला आहे. तर अदानी – अंबानी हे अधिक श्रीमंत होत आहेत. शाहू – फुले – आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा प्रयत्न या युती सरकारच्या काळात होत आहे. जातीयवादी लोक हे करत असून यांना आज आवरण्याची गरज आहे. यावेळी चोपडा कारखान्याचा प्रश्न नक्कीच सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द अजितदादा पवार यांनी चोपडावासियांना दिला आहे.

- Advertisement -

जाहिरातीसाठी कोटींचा खर्च

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. या तिन्ही राज्यांमधील पराभवाचा भाजपने मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे मागील चार वर्षांत भाजप सरकारने सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना कसा फायदा झाला त्याची यशकथा ‘रिपोर्ताज’च्या माध्यमातून लोकांना दाखविण्यात येणार आहे. तसेच लाभार्थींनी कशा प्रकारे योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावले हे दाखवल्यास अन्य लाभार्थींना प्रोत्साहन मिळते आणि योजनांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे यात दाखवण्यात आले आहे. यासाठी मराठीतील काही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या लाभार्तींच्या अनुभवावर आधारित ‘टीव्ही रिपोर्ताज’ची निर्मीती करुन प्रसारित करण्याची मोदी सरकारची योजना आहे. या योजनेकरता १३ कोटी ३५ लाख रुपयांची उधणपटी केली आहे. या मराठीतल्या सहा खासगी चॅनलवर झळकणाऱ्या जाहिराती ६० सेकंदांच्या असणार आहेत. या योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा ‘होय, मी लाभार्थी’च्या जाहिराती पुन्हा टीव्हीवर झळकणार आहेत.


वाचा – भाजपची जाहिरातबाजीच मोठी! कार्यकर्त्याचा आरोप!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -