घरमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप सज्ज; १२ नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप सज्ज; १२ नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार

Subscribe

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. मुंबईत मंगळवारी भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकींसाठी रणनिती ठरवली गेली आहे. पक्षाचे प्रमुख १२ नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. आजही पुन्हा भाजप पदाधिकाऱअयांची बैठक होणार आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय राम मंदिर निधी, कार्यलय निर्माण या मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदारी तयारी सुरु केली आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याने भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली असून १२ मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. यात काही नेत्यांकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. यात आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज पुन्हा एकदा भाजपच्या पमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महानगर पालिकांच्या निवडणुकांबाबत खलबतं होणार असल्याचं समजतंय. आगामी काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.


हेही वाचा – प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काँग्रेस नेत्यांची मुंबईत खलबतं

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -