घरमहाराष्ट्रउदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून तोडीसतोड उमेदवार

उदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून तोडीसतोड उमेदवार

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले एकहाती जिंकूण येतात. त्यामुळे त्यांना तडीस तोड देणारा उमेदवार आता भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता पुन्हा मिळावी यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न केले जात आहे. साताऱ्यामध्ये गेल्या कित्येक निवडणुकांमधून उदयनराजे भोसले एकहाती जिंकूण येत आहेत. त्यामुळे साताऱ्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी उदयनराजेंना तोडीसतोड असा उमेदवार उभा करण्याचा विचार भाजप करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत सातारा मतदारसंघ आरपीआयला देण्यात आला होता. यावर्षी मात्र, भाजप या मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

नरेंद्र पाटलांची चर्चा

उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे येत आहे. साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. हा फायदा साताऱ्यातील इतर मतदारसंघामध्येही होऊ शकतो. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे यांच्यासमोर नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -