“मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?”, भुजबळांची टीका

'हाथरस बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे'

हाथरस बलात्कार प्रकरणावरून राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. हाथरस प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. “मुलींना संस्कारित करा असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?,” असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे. हाथरस प्रकरणानंतर मोदी सरकार शांत बसले असल्याचेही ते म्हणाले आहेत. ते मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे

हाथरस बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे. उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज होती. “कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते. पण दुसरीकडे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षाही दिली गेली नाही. सुरक्षा राहिली बाजूला त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे.” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भुजबळांनी संतप्त विचारणा करत असे म्हणाले की, “भाजपाचे लोक आरोपींच्या बाजूने एकत्र आले असून मुलींना संस्कारित करा असे त्यांचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?”

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले तेव्हा त्यांनाही रोखण्यात आले. आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला.

चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजं असतानाच भाजपा आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असे वक्तव्य भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.


‘मुलींवर संस्कार करणं आई-वडिलांचं कर्तव्य’; बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराचे वक्तव्य