घरमहाराष्ट्रछत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या

Subscribe

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर (वय ४५) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असी माहिती मिळत आहे. कुटुंबियांनी मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. निंबाळकर पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात येत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच चारच दिवसापूर्वी त्यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. सहकारी कारखान्यापैकी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -
Chhatrapati co operative sugar mill president pradeep nimbalkar shot himself
प्रदीप निंबाळकर (डावीकडून पहिले) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना

इंदापूर तालुक्यातील सणसर येथील राहत्या घरी हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. दुपारी गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कुटुंबीयांनी निंबाळकर राहत असलेल्या खोलीकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत पडलेल्या निंबाळकरांना तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निंबाळकर यांच्याबद्दलचे वृत्त मिळाल्यानंतर बारामतीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी रुग्णालयात भेट देवून परिस्थिती जाणून घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -