Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विदर्भावर कधीही अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री

विदर्भावर कधीही अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

'विदर्भ माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मी विदर्भावर कधीही अन्याय होऊ देणार नाही', असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.

Related Story

- Advertisement -

‘विदर्भ माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मी विदर्भावर कधीही अन्याय होऊ देणार नाही’, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण पार पडले, त्यावेळी जनतेला दिले आहे. तर यावेळी त्यांनी विदर्भात मजबूत असलेल्या भाजपला देखील टोले लगावले आहेत.

विदर्भ हा राज्याचा अविभाज्य घटक

‘नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे, याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. तसेच विदर्भ माझ्या हृदयात आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. यामुळे मी तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू’, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

- Advertisement -

‘नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. यासोबतच, गेली अनेक वर्षे नागपुरात देखील मुंबईप्रमाणे वर्षभर विधिमंडळाचं कार्यालय सुरु करावं’, अशी मागणी केली जात होती. ती आता पूर्ण होत असल्याने आनंद होत असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – औरंगाबाद महापालिकेची सत्ता मिळताच पहिल्याच दिवशी संभाजीनगर नामकरण करू – चंद्रकांत पाटील


- Advertisement -

 

- Advertisement -