घरताज्या घडामोडीवर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

Subscribe

शिवसेना खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. ५ जानेवारीला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, एक दिवस आधिच वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्याने सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. याबाबतचं पत्र ईडीला पाठवलं होतं. ईडीने ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

वर्षा राऊत यांना ईडीने एमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी याआधी देखील दोन वेळेस ईडीने नोटीस पाठवली होती. दरम्यान, ईडीने ५ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचल्या. दरम्यान, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -