अखेर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे दार उघडणार; तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्यात गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यामुळे मंत्रालयातील सर्व मंत्र्यांच्या कायार्लयांना बुधावारी टाळे लावण्यात आल्यानंतर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष देखील बंद करण्यात आले. त्यामुळे राज्यभरातून मंत्रालयात मदतीसाठी आलेल्या रुग्णांच्या पदरात निराशा पडली होती.

Mumbai
Mahashivaghadi leaders demand to start Chief Minister's Medical Assistance Fund
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे (Tenure Posts) निर्माण करुन त्या पदांवर सध्या ३ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या हजारो रुग्णांना आता दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यामुळे मंत्रालयातील सर्व मंत्र्यांच्या कायार्लयांना बुधावारी टाळे लावण्यात आल्यानंतर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष देखील बंद करण्यात आले. मात्र त्याची माहिती सामान्य नागरिकांना नसल्याने गुरुवारीही अनेक रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी सहाव्या मजल्यावर पोहचले. पण हे कक्षच बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या पदरी निराशा पडली.


हेही वाचा – ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य


५६ हजारांहून अधिक रुग्णांना मदत

आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. यामध्ये विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांचा समावेश असून त्यांना एकूण साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर २००९ ते २०१४ मध्ये सुमारे १६ हजार रूग्णांना ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रूपये वितरित करण्यात आले होते. तर कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रूग्णांना सुमारे ९० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे यावर बराच वाद निर्माण झाला होता. अखेर या सर्वांची गंभीर दखल घेत शासनाने नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.


हेही वाचा – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपाल भेट तूर्तास स्थगित


तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता कक्षासाठी नियुक्त करण्यात आलेले ३ अधिकारी या कक्षात रुजूही झाले आहेत. लेखा आणि कोषागारे संचालनालयातील १ सहायक संचालक आणि २ सहायक लेखा अधिकारी यांची नियुक्ती सध्या करण्यात आली आहे.