Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर CORONA UPDATE Corona Live Update: पुण्यात आज १,१३४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

Corona Live Update: पुण्यात आज १,१३४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

Mumbai
corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पुण्यात आज १ हजार १३४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून २९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार ९७८वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत ९१९ जणांचा मृत्यू झाला आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली


वसई तालुक्यात सोमवारी तब्बल ३०७ रुग्णांची भर पडली असून त्यातील २८३ वसई-विरार महापालिका हद्दीतील आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ६ हजार ४५३ वर जाऊन पोहोचली आहे. तर वसईच्या ग्रामीण भागात २४ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ३०३वर गेली आहे.

महापालिका हद्दीत नालासोपार्‍यात ११५, वसईत ९८, विरारमध्ये ५७ आणि नायगाव परिसरात १३ रुग्ण आढळून आले आहेत. वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून महापालिका हद्दीतील मृतांची संख्या १२९ झाली आहे. ग्रामीण भागात कळंबमध्ये १०, अर्नाळ्यात ४, पारोळमध्ये २, रानगावमध्ये ७ आणि चंद्रपाड्यात एक रुग्ण आढळून आला आहे.


मुंबईत मागील २४ तासांत ८०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८६ हजार १३२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४ हजार ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


दादरमध्ये आज २० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा १ हजार ४वर पोहोचला आहे. तर माहिममध्ये आज ११ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून एकूण माहिममधील आकडा १ हजार २७५ झाला आहे.


गोव्यात आज ९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९०३वर पोहोचला आहे. यापैकी सध्या ७३९ रुग्णांवर उपचार सुरू असून १ हजार २५६ रुग्ण बरे झाले आहे. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गोव्याची आरोग्य विभागाने दिली आहे.


आज दिलासा देणारी बाब म्हणजे धारावीत एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३३५वर पोहोचला असून यापैकी ३५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे आणि १ हजार ७३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार १३४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून २२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १७ हजार १२१वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २५० झाला आहे. सविस्तर वाचा 


गेल्या २४ तासांत ६९ नवे कोरोनाबाधित बीएसएफ जवान आढळले असून २९ जण रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत १ हाजर ४५४ कोरोनाबाधित बीएसएफ जवान आढळले आहेत. त्यापैकी ८५२ जण रिकव्हर झाले असून सध्या ५९५ जणांवर उपचार सुरू आहेत.


केडीएमसी महापालिका क्षेत्रात आज एकूण ३८१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या उपाचर घेतल असलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार २९२ आहे. तसेच आतापर्यंत ४ हजार ४३७ रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १५१ रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.


राज्यात १ हजार ८९ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी एका पोलीस अंमलदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता ७१ झाली आहे. त्यात पाच पोलीस अधिकार्‍यांसह ६६ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

सोमवारी रात्री उशिरा राज्यातील विविध रुग्णालयात ११८ कोरोनाबाधित पोलीस अधिकार्‍यांसह ९७१ पोलीस कर्मचार्‍यांवर उपचार सुरू असल्याची नोंद झाली. तर कोरोनामुळे ७१ पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या ४५ इतकी आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत २९६ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८६३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ५ हजार ९८५ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३३५ अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत २९ हजार ७९२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८८ हजार ७५७ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून ११ कोटी ४४ लाख ७२ हजार ९८७ रुपयांचा दंड वसुल केला आहे.


जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी २७१ गुन्ह्यांत ४९४ जणांवर कारवाई

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी २७१ गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांत दिवसभरात ४९४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी १३४ जणांना जामिनावर तर ३५६ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. गेल्या १०९ दिवसांत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १३ हजार २९३ गुन्ह्यांची नोंद करताना २७ हजार ८८७ जणांवर कारवाई केली आहे. त्यात १५ हजार ५१० जणांना जामिनावर तर ९ हजार ३१ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ३ हजार ३४६ जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जमावबंदीचे आदेश असतानाही काहीजण या आदेशाचे उल्लघंन करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध २० मार्चपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. यातील सर्वाधिक ४ हजार ९१५ गुन्हे उत्तर मुंबईत झाले आहे. दक्षिण मुंबईत १ हजार ३६८ गुन्हे, पूर्व मुंबईत २ हजार ३७४ गुन्हे, मध्य मुंबईत २ हजार ३८२ गुन्हे, पश्चिम मुंबईत २ हजार २५४ गुन्ह्यांचा समावेश आहे. मास्क न वापरल्याप्रकरणी रविवारी ७८ जणांवर तर २० मार्चनंतर आतापर्यंत ३ हजार ७३१ जणांवर कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहे. देशभरातील १ हजार ११५ लॅब्समध्ये या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ८४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अॅक्टीव्ह केसेसपेक्षा १ लाख ८० हजार ३९० इतका जास्त बरे होणाऱ्यांचा आकडा आहे. भारताचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ६१.१३ इतका आहे.


कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरच्या चिठ्ठीची आवश्यकता नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळांमध्येही विना प्रिस्क्रिप्शन चाचणी करता येणार आहे. आत्तापर्यंत खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. यासंबंधी अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमावलीनुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्यांना खासगी प्रयोगशाळेतही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचण्या करता येणार आहेत. (सविस्तर वाचा)


भारतात स्वस्त दरात तयार होणार ‘रेमडेसिवीर’; जाणून घ्या, किंमत

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. मात्र, ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान, आता या औषधाचं उत्पादन भारतात होणार आहे. यासह या औषधाची विक्रीही करता येणार आहे. भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


दिल्लीत कोरोना रूग्णांचा आकडा १ लाख पार!

देशाची राजदिल्लीत कोरोना रूग्णांचा आकडा १ लाख पार!धानी दिल्लीमध्ये देखील कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. दिलासादायक म्हणजे सोमवारी गेल्या काही दिवसांपेक्षा कोरोनाचे कमी रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ३७९ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली त्यानंतर दिल्ली शहरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांचा आकडा १ लाखांवर पोहोचला असून सध्या दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८२३ झाला आहे. (सविस्तर वाचा)


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ६ जुलैपर्यंत १ कोटी २ लाख ११ हजार ९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल २ लाख ४१ हजार ४३० जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.


भारतात कोरोनाबाधितांची संख्या ७ लाखांच्या वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २२ हजार २५२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४६७ जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. आतापर्यंत ७ लाख १९ हजार ६६५ इतके कोरोनाबाधित आढळले असून यामध्ये २ लाख ५९ हजार ५५७ इतके अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर ४ लाख ३९ हजार ९४८ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंतच्या मृतांचा आकडा २० हजार १६० झाला आहे. (सविस्तर वाचा)


पुण्यातील ६० वर्षीय वृद्धाची क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना आत्महत्या. पुणे महापालिकेच्या कोंढवा येथे काल ही घटना घडली. या व्यक्तीसह त्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.


राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २६ झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. तसेच २४ तासांत ३ हजार ५२२ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.३७ % एवढा झाला आहे.