घरमहाराष्ट्रमुलासह अपहरण झालेल्या महिलेचा तातडीने तपास करण्याची मागणी

मुलासह अपहरण झालेल्या महिलेचा तातडीने तपास करण्याची मागणी

Subscribe

नगर तालुक्यातील गुंडेगाव हराळ मळा येथील पारधी समाजाच्या महिलेचे तिच्या मुलासह दि. २५ मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी तातडीने त्या दोघांचा शोध घेण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

नगर तालुक्यातील गुंडेगाव हराळ मळा येथील पारधी समाजाच्या महिलेचे तीच्या मुलासह अपहरण करण्यात आले असता याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करुन तीचा शोध घेण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले आहे. पुजा चव्हाण असे या अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच तिच्या सोबत तिचा ३ वर्षीय मुलाचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला इतरांच्या घरामध्ये जाऊन घर काम करत असे.

पोलिसांचा नातेवाईकांकडे शोधण्याचा सल्ला

अपहरण झालेली महिला पूजा चव्हाण घर काम करीत असताना तिला आणि तिच्या तीन वर्षीय मुलगा यश याला दि.२५ मार्च रोजी अज्ञात इसमांनी गाडीत टाकून घेऊन गेले. तर त्या महिलेचा दुसरा मुलगा झोपेत असल्याने तो घरीच राहिला. या प्रकरणी चव्हाण कुटुंबीय नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, तक्रार न घेता सदर महिलेचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचा सल्ला पोलीसांनी दिला. नातेवाईकांसह अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील अपहरण झालेल्या महिलेचा आणि मुलाचा शोध अद्यापही लागलेला नाही. तरी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन, सदर महिलेचा आणि तिच्या मुलाचा शोध घेण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -