घरमहाराष्ट्रमी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

Subscribe

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करत आहेत. यावर मौन बाळगलेल्या फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. एकनाथ खडसे भंगाळे प्रकरणावरुन सातत्याने फडणवीसांवर टीका करत होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. यावेळी खडसेंच्या ड्राय क्लिनरच्या टीकेवरही उत्तर दिलं आहे.

“आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर बोलताना, “मनिष भंगाळे प्रकरणात खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेनी त्यांच्यावर आरोप लावल्यानंतर मी स्वत: ADG-ATS ची कमिटी तयार करुन १२ तासात अहवाल द्यायला लावला. १२ तासात खडसेंना क्लिन चीट मिळाली आणि भंगाळेला जेलमध्ये टाकलं. कित्येक दिवस भंगाळे जेलमध्ये होता. या प्रकरणात खडसेंना राजिनामा द्यावा लागला नाही. मात्र, ते या क्लिन चीटला ड्राय क्लिनरची क्लिन चीट म्हणत असतील म्हणू द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

- Advertisement -

“एकनाथ खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबांनी एमआयडीसीची जागा घेतली. त्यांनी स्वत: बैठक घेतली आणि त्याची भरपाई घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. खडसेंच्या मागणीनंतर मी न्यायाधिशांची कमिटी तयार केली. त्यानंतर त्याचा अहवाल आमच्याकडे आला. त्याआधी काही जणांनी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाकल करा असा निर्णय दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. मी आकसापोटी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे खडसेंनी विनाकारण गैरसमज पसरवू नये. त्यावर एकत्र बसून चर्चा करू व ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी मिटवू,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांवर असलेली नाराजी काही दिवस बोलून दाखवत आहेत. गुरुवारी पार पडलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या पुस्तक प्रकाशनावेळी खडसेंनी पुन्हा फडणवीसांवर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला फार त्रास झाला. माझ्यविरोधात षडयंत्र रचलं गेलं, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तसंच याबाबत मी पुरावे जमा केले असून लवकरच यावर एक पुस्तक देखील लिहणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -