घरCORONA UPDATECoronavirus Lockdown: २ वर्ष पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे - दानवे

Coronavirus Lockdown: २ वर्ष पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे – दानवे

Subscribe

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यात पुढचे दोन वर्ष पुरेल इतका अन्न-धान्याचा साठा आहे. हा साठा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सरकार करेल, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. दानवे म्हणाले की, लॉकडाऊन असले तरी राज्याला अत्यावश्यक वस्तूंचा योग्य तो पुरवठा केला जाईल. केंद्राकडे अन्न धान्याचे खाद्य भांडार भरलेले आहे. जर कोणतेही राज्य आमच्याकडे मदत मागू लागले तर त्यांना आम्ही हा पुरवठा करु शकतो.

लॉकडाउन च्या परिस्थितित सुद्धा जीवनावश्यक वस्तुंचा योग्य पुरवठा करण्या साठी केंद्र सरकार सर्व प्रयत्न करते आहे.केंद्र सरकार कड़े भरपूर अन्न धान्याचा साठा आहे.किमान २ वर्ष पुरेल इतका साठा केंद्र सरकार कडे उपलब्ध आहे.त्यामुळे काळजी करू नका आणि घरातच रहा, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे.#Social_Distancing हा एकच पर्याय आपल्या कडे आहे त्यामुळे काळजी घ्या.

Raosaheb Patil Danve ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 25, 2020

- Advertisement -

जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा किंवा वाहतूक करण्यास जर कोणत्या अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, अशीही सूचना दानवे यांनी यावेळी केली आहे.

दिंनाक २४ मार्च रोजी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्वच शहरांमध्ये लोकांनी दुकानांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. २१ दिवस लॉकडाऊन झाल्यावर आवश्यक अन्नधान्य मिळणार नाही, असा लोकांचा समज झाला होता. त्यानंतर आज रावसाहेब दानवे यांनी आपल्या फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत लोकांची समजूत काढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -