घरमहाराष्ट्रकोयनानगर येथे भूकंपाचा सौम्य धक्का

कोयनानगर येथे भूकंपाचा सौम्य धक्का

Subscribe

कोयनानगर येथे मंगळवारी रात्री सौम्य भूकंपाचे धक्के जाणले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे मंगळवारी रात्री ९:४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तिव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १२.८ किलोमीटरवर असल्याची माहिती समोर आली आहे.

या परिसरात जाणवला भूकंपाचा धक्का

कोयनानगर येथे मंगळवारी रात्री ९:४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. हा धक्का कोयना तसेच पाटण परिसरात जाणवल्याचे दिसून आले, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. दरम्यान, कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका कायम सुरूच असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा धक्का कमी तिव्रतेचा असल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -