घरमहाराष्ट्रउस्मानाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

Subscribe

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका वयोवृध्द शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तलमोड गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावामद्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी उमरगा पोलीस स्टेशनबाहेर मृतदेहासह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

काय आहे घटना ?

उमरगा तालुक्यातील तलमोड येथे कारचा पुढचा टायर फुटून गँसचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये गाडीने पेट घेऊन यामध्ये गाडीतील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. रविवारी ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तलमोड गावातील काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या होत्या. तसंच अग्निशमन दलाची गाडी अडवली होती. याप्रकरणी पोलिसांनी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केले होते.

- Advertisement -

कोबिंग ऑपरेशन दरम्यान मारहाण 

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक मध्यरात्री तलमोड या गावात धाव घेतली आणि कॉम्बिग ऑपरेशन सुरु केले. या दरम्यान त्यांनी गावातील अनेक जणांच्या घरांची तोडफोड करत गावातील ५ ते १० तरुणांना ताब्यात घेतले. त्या दरम्यान, दत्तू मोरे हे ७० वर्षाच्या शेतकऱ्याला त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणती त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण पसरले.

पोलीस स्टेशनसमोर मृतदेह ठेवून ठिय्या

पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्या दत्तू मोरे यांचा मृतदेह घेऊन संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उमरगा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनच्या बाहेर मृतदेह ठेवून गावातील शेकडो ग्रामस्थांनी ठिय्या मांडून बसले आहेत. दरम्यान, गाव पातळीवर एखादे प्रकरण मिटविण्यासाठी गावात शांतता बैठक घेवून योग्य कार्यवाही करणे आवश्यक असते परंतू पोलीसांनी ते न करता मध्यरात्री धरपकड सुरू केली उमरगा तालुक्यातील वातावरण गढूळ झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -