पुण्यात डीपीला आग; एकाचा मृत्यू

पिंपरी - चिंचवडमधील डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागून एका व्यक्तीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune
fire broke out at pimpri-chinchwad dp
पुण्यात डीपीला आग; आगीत एकाचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्रामध्ये काही केल्या आगीचे सत्र कमी होताना दिसत नाही. दररोज कुठल्या न कुठल्या ठिकाणी आगीच्या घटना घडताना दिसत आहेत, असे असताना आज पुन्हा एकदा पुण्यात आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये डीपीला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास लागली. या घटनेमध्ये एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे? डीपीजवळ काय करत होती. ही माहिती अद्याप समजू शकलेलं नाही.

अशी घडली घटना

पिंपरी – चिंचवडमधील डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पुणे अग्निशमन विभागाने तात्काळ रहाटणी विभागाला ही माहिती कळवली. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, डीपीमध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून आगीचे नेमके कारण देखील अद्याप समजू शकले नाही. याबाबतची वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.


वाचा – पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here