घरमहाराष्ट्रकोल्हापूरात पावसाचा हाहाकार; तब्बल ८८ बंधारे पाण्याखाली!

कोल्हापूरात पावसाचा हाहाकार; तब्बल ८८ बंधारे पाण्याखाली!

Subscribe

पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर गेली असून ३९ फूट नदीची इशारा पातळी असल्याने एका रात्रीत दहा फूट पाणी वाढल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगरासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहेत. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर कोल्हापूरातही गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर पंचगंगेने आपली पातळी ओलांडली असून ती आता ३५ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे कोल्हापूरात पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूरमध्ये इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेकडो गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पंचगंगेने नदीची पाणी पातळी ओलांडली

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून कोल्हापूरमधील जिल्ह्यातील तब्बल ८८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर गेली असून ३९ फूट नदीची इशारा पातळी असल्याने एका रात्रीत दहा फूट पाणी वाढल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisement -

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची उसंत

राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने तिलारी दाजीपूर गगनबावडा भागात गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतली असून फारसा पावसाचा जोर नसल्याने शेतकरी अजूनही चिंताग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.


Live Mumbai Rain: केळवे रोड रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -