विंचूरच्या अन्नप्रक्रिया उद्योगाला ‘बूस्ट‘

वाईनचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विंचूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग तीन महिन्यात सुरूवात होण्याची अपेक्षा आहे.

Nashik
lasalgaon
वाईनचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विंचूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग तीन महिन्यात सुरूवात होण्याची अपेक्षा आहे. यामुळे विंचूर शहराचे रुपडे पलटणार आहे. तसेच रोजगाराची निर्मिती होऊन परिसराला मोठा फायदा होणार आहे. भाजीपाला आणि फळांवर प्रोसेसिंग करून त्याची एक वर्षापर्यंत टिकवणं क्षमता राहणार आहे. येथून प्रोसेस झालेला शेतमाल हा यूरोप व रशियाला निर्यात होणार आहे.
विंचूरमधील फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये अन्नप्रक्रिया यंत्रणाचे पूजन दक्षिणामया श्रृंगेरी श्री शारदा पिठादिश्वर जगतगुरु श्री श्री श्री विधुशेखरा भारती महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. यावेळी पॉलीसेट्टी सोमासुंदरम अ‍ॅग्रो एक्सपोर्टचे पॉलीसेट्टी शाम सुंदरम, शिवसाई एक्सपोर्टचे चरकुरी शाबाशिव राव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रशिया येथील नेवसकाया कंपनीचे अध्यक्ष अल्केसंद्र फ्रेंकेल, संचालक बोरिस फ्रेंकेल, संचालक गेनाडिल फ्रेंकिल, चरकुरी नरेश चौधरी, सुधाकर रेड्डी, एम. जे कन्ट्रक्शनचे मोहम्मद इस्माईल, मोहम्मद इकबाल, मोहम्मद अनस, प्रमोद भांबरडीकर, शाम मंडलीक, शिवदास आव्हाड आदी उपस्थित होते.
विंचूर फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये तीन महिन्यात युनिट्सची सुरूवात होण्याची अपेक्षा आहे. फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये दोन युनिट उभारले आहे. त्याचप्रमाणे पॉलिसेटी सोमासुंदरम अ‍ॅग्रो एक्सपोर्ट्सने या दोन्ही कंपनीमधून १५० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केला आहे. हे कृषी उत्पादनासाठी प्रोसेसिंग युनिट असणार आहे.
कंत्राटी शेतीचा समावेश
शिवसाई एक्सपोर्ट आणि सोमासुंदरम अ‍ॅग्रो या दोन्ही कंपन्या १५० कोटींच्या गुंतवणुकीद्वारे अन्नप्रक्रिया यंत्रणा उभारत आहे. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. याशिवाय, यात कंत्राटी शेतीचा समावेश असणार आहे. शिव साई एक्सपोर्ट गोठविलेल्या फळे आणि भाजीपाला रशिया व युरोप मध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करते. विंचूर येथे नवीन अन्नप्रक्रिया उद्योग सुरु होणार असून संपूर्ण निर्यात ही विंचुर येथील प्रकल्पामधून होणार आहे. या प्रकल्पाची क्षमता १० मॅट्रिक टन प्रतितास असेल, शिवासाई एक्स्पोर्ट्सचे सूत्रांनी सांगितले.
कांदा निर्जलीकरण सर्वात मोठा प्रकल्प
करार शेतीद्वारे मोठ्या संख्यात शेतकर्‍यांसह संलग्न होतील, असा अंदाज आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, की या प्रक्रियेची क्षमता दरवर्षी ४० हजार मेट्रिक टन होईल. महितीनुसार कांदा निर्जलीकरण प्रकल्प हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. 
विंचूरचे भाग्य उजळणार
काही उद्योजकांनी सांगितले, की विंचूर पार्कमधील खाद्य प्रसंस्करण क्षेत्रातील नवीन गुंतवणूक नक्कीच स्थानिक शेतकर्‍यांना मदत करेल. विशेषत: भाजीपाला आणि फळांची लागवड करण्यासाठी नाशिक जिल्हा हा देशात ओळखला जातो. या गुंतवणूकमुळे विंचुर व परिसराचे भाग्य उजाळणार हे मात्र नक्की.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here