घरमहाराष्ट्रउध्दव ठाकरेंवर पूर्ण विश्‍वास

उध्दव ठाकरेंवर पूर्ण विश्‍वास

Subscribe

सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सगळ्यांना घेऊन चालणारे गृहस्थ आहेत. ते स्वत: कोणाच्याच कामात हस्तक्षेप करत नाहीत. जिथे योग्य तिथे कौतुक करण्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं कसब वाखाणण्याजोगे आहे. अशा संयमामुळे सरकार निसंकोच पाच वर्षं चालेल, यात मला संदेह वाटत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांचं कौतुक केलं. महाविकास आघाडी सरकारचं काम वळणावर आहे. यामुळे उगाच रिमोटची आवश्यकता नाही. आवश्यकता पडली तर मदतीला आवर्जून पुढे असेल, अन्यथा सरकारला काम करू देण्यातच आपला कल असेल, असं पवार यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान स्पष्ट केलं.

भाजप नेत्यांकडून उडवल्या जाणार्‍या वावड्यांकडे लक्ष वेधता पवार यांनी सरकार पडेल हे भाजप नेत्यांची स्वप्न ही स्वप्नवतच राहतील. पाच वर्षे सरकार बिनधोक काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. वेगळ्या विचारांचे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांचं पवार यांनी ध्येय्य सारखेच आहे. किमान समान कार्यक्रम हा महाराष्ट्राला पुढे नेणारा कार्यक्रम आहे.

- Advertisement -

याच कार्यक्रमाला नजरेपुढे धरत सरकारचं काम सुरू आहे. सर्वात मोठी जबाबदारी नेतृत्वाची असते. ज्यांच्याकडे सरकारचं नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत. दुसर्‍याच्या कामात उगाच हस्तक्षेप करण्याचा त्यांचा स्वभाव नाही.

विशेष म्हणजे समन्वय समितीच्या माध्यमातून येणारे प्रश्न एकत्र सोडवले जात असल्याचं पवार म्हणाले. जुन्या सरकारचे काही निर्णय बदलणं आवश्यक होतं. ते बदलल्यामुळे त्याचा राज्यावर विशेष परिणाम होणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये मूलभूत फरक असल्याचं पवार म्हणाले. याआधी काँग्रेस पक्षाला प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीत जावं लागत होतं. आता यात बदल झाला आहे. सरकार टिकलं पाहिजे, अशी भावना काँग्रेस पक्षाचीही आहे. उगाच वाद उत्पन्न होणार नाहीत, ही समज तिन्ही पक्षांकडे असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या दिल्ली भेटीनंतरच्या पवारांच्या या मुलाखतीतील स्पष्टीकरणामुळे महाविकास आघाडीवर याचा काहीही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -