घरमहाराष्ट्रमुंबई- गोवा महामार्गावर गॅस टँकरला अपघात

मुंबई- गोवा महामार्गावर गॅस टँकरला अपघात

Subscribe

टँकरमधून गॅस लिकेज होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परिसरातला विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. खारपाडा पुलाजवळ गॅस टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे मुंबबईकडे येणारी वाहतूक पेणमार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टँकरमधून गॅस लिकेज होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परिसरातला विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पहाटेच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून या महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे गॅसने भरलेला टँकर पलटी झाला. हा अपघात पहाटे दोनच्या दरम्यान घडला. हा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. गॅस गळती होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. पहाटे तीन वाजल्यापासून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान एका दिशेने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. टँकर हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -