घरमहाराष्ट्र'अण्णा, आता आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका' - गिरीश महाजन

‘अण्णा, आता आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका’ – गिरीश महाजन

Subscribe

'अण्णा, आता आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका', अशी विनंती गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांना केली आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत ६ तास बैठक झाल्यानंतर अखेर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतले आहे.

‘अण्णा, आता आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका’, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून अण्णा हजारे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून कसून प्रयत्न केले जात होते. उपोषण सुरु झाल्यापासून गिरीश महाजन आज तिसऱ्यांदा राळेगणसिद्धी येथे गेले होते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी पहिल्या दिवसांपासून गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. परंतु, अण्णा हजारे यांनी पहिल्याच दिवशी गिरीश महाजनांना राळेगणला न येण्याचा इशारा दिला होता. ‘गिरीश महाजन तुम्ही येऊ नका, तुमच्याने काही होणार नाही’, असे अण्णा हजारे म्हणाले होते. अखेर आज मुख्यमंत्रींसोबत झालेल्या ६ तासांच्या चर्चेनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी ‘आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका अण्णा’, अशी विनंती केली आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गिरीश महाजन यांनी हसत हसत पुन्हा त्रास न देण्याची विनंती केली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, ‘मी अण्णा हजारेंचे अभिनंदन करतो. अण्णांमुळे खुप महत्त्वाते कायदे लागू करण्यात आले आहेत. मी आता फक्त ऐवढेच बोलेल की, आम्हाला पुन्हा त्रास देऊ नका अण्णा. पुन्हा उपोषण करु नका. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर अण्णांच्याही चेहऱ्यावर हास्य आले आणि भर सभेत हशा पिकला.

- Advertisement -

गिरीश महाजनांची दमछाक होते

गेल्या उपोषणावेळी अण्णा हजारे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना पाठवले होते. तेव्हा अण्णा हजारेंची समजूत काढण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु, यावेळी अण्णा हजारेंची समजूत काढण्यास गिरीश महाजन यांना यश मिळाले नाही. यासाठी त्यांनी तीन वेळा अण्णांची भेट घेतली. याअगोदरही इतर आंदोलनामध्ये आंदोलकांची समजूत घालण्यासाठी राज्य सरकारडून गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले आहे. मुंबईमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मोर्चा असूद्या किंवा मराठा क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण असूद्या मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांना आंदोलकांची समजूत घालवण्यासाठी पाठवले आहे. परंतु, आंदोलकांची समजूत घाळण्यात गिरीश महाजन यांची दमछाक होते. त्यामुळे आज अण्णांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पुन्हा त्रास देऊ नका, अशी विनंती केली.


हेही वाचा – सातव्या दिवशी अण्णांचे उपोषण मागे; सर्व मागण्या मान्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -