घरCORONA UPDATECorona: गरिबांना १० हजार रुपये द्या; प्रदेश काँग्रेसकडून मागणीचा पुनरुच्चार

Corona: गरिबांना १० हजार रुपये द्या; प्रदेश काँग्रेसकडून मागणीचा पुनरुच्चार

Subscribe

देशव्यापी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरिबांच्या बँक खात्यात केंद्र सरकारने १० हजार रुपये जमा करावेत आणि पुढील सहा महिने प्रतिमहा ७५०० रुपये द्यावेत. स्थलांतरित मजुरांना सुखरुप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा पुनरुच्चार गुरुवारी प्रदेश काँग्रेसने केला. कोरोना विषाणुच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरित मजूर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसने ‘स्पीक अप इंडिया’ ही देशव्यापी ऑनलाईन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या घटकांना मदत करावी, अशी मागणी केली.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी. मनरेगातर्फे २०० दिवसांचा रोजगार द्यावा, या मागण्याही काँग्रेसने मोहिमेच्या माध्यमातून केल्या आहेत. देश सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनमुळे कामगार, गरिब, हातावर पोट असलेले, शेतकरी, लघु उद्योजक यांना मोठ्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करून पीडित घटकांना आधार देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसने ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहीम राबवल्याचे थोरात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: मुंबईत अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -