घरमहाराष्ट्रनंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी

नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी

Subscribe

तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरुन नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलीस आणि प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरुन ही दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या दगडफेकीत काही प्रवासी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच यावेळी पोलिसांनी अश्रु धुराचा वापर करत जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

तरुणीची छेड काढल्याच्या संशयातून नंदुरबारच्या रेल्वे स्थानकावर दगडफेक करण्यात आली होती. अचानक करण्यात आलेल्या दगडफेकीत काही प्रवासी आणि पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीच्या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच या जमावावर नियंत्रण मिळवण्याकरीता पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भीषण! पोटच्या मुलांच्या समोरच पतीने केला गर्भवती पत्नीचा खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -