घरमहाराष्ट्रवाकण-खोपोली मार्गावर अवजड वाहतूक सुरूच

वाकण-खोपोली मार्गावर अवजड वाहतूक सुरूच

Subscribe

दुर्लक्षामागे ‘अर्थ’कारण

रस्त्याचा निकृष्ट दर्जा, वाटेतील तीन कमकुवत पूल आणि दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश असतानाही वाकण-पाली-खोपोली महामार्गावर अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या वाहतुकीकडे पोलीस आणि परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने यामागे काहीतरी ‘अर्थ’ दडला असावा, अशी उघड चर्चा आता सुरू झाली आहे.

या महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. हे काम होत असताना दोनदा ठेकेदार बदलले आहेत. येत्या जूनपर्यंत काम करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार देत आहे. यावर्षी पावसाने या मार्गाची पुरती दैना उडवून टाकली आहे. रस्त्याची दुरवस्था, तसेच या मार्गावरील तीन पूल अवजड वाहतुकीमुळे अधिक कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशान्वये अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे. मात्र तरीही अवजड वाहतूक राजरोस सुरू आहे. कधीकाळी कारवाई झालीच तर माहितगार अवजड वाहतूक करणारे या मार्गाचा सायंकाळनंतर वापर करणे पसंत करतात. सध्या लोखंडी पाइप, खडी, त्याचप्रमाणे अन्य साहित्याची वाहतूक सुरू असते.

- Advertisement -

एमएसआरडीसीने याबाबत उप प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेला पत्र देऊन या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची विनंती केली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने या वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहनचालकांत हमरीतुमरीचे प्रसंग येतात. क्षुल्लक कारणावरून वाहन चालकावर कारवाईचा बडगा उचलणारे वाहतूक पोलीस किंवा आरटीओ राजरोस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीला का रोखत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -