घरमहाराष्ट्रनाशिकमधून शेकडो शेतकरी मुंबईच्या दिशेने

नाशिकमधून शेकडो शेतकरी मुंबईच्या दिशेने

Subscribe

कृषी कायद्याविरोधात २६ जानेवारी राजभवनावर धडकणार

शेतकरी मागण्यांचे गीत सादर करत, किसान सभेचे ध्वज हाती घेत नाशिकमधून शेकडो शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. २६ जानेवारी रोजी हे शेतकरी राजभवनवर धडकणार आहेत.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रदद करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. २४) रोजी राज्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत. व नंतर राजभवनावर धडकरणार आहेत. राज्यातील शंभरावर संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. राज्यातील आंदोलनासाठी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी आंदोलन दुपारी गोल्फ क्लब मैदानावर जमा झाले. त्यानंतर या सर्व शेतकर्‍यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले. या आंदोलनात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची निर्मिती केली आहे.

या आहेत मागण्या

  • शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा
  • शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा
  • वीज विधेयक मागे घ्या
  • कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा
  • वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा
  • महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकर्‍यांना योजनेचा लाभ द्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -