घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टराणे-राऊत वाद रंगलो, कोणाक होतलो फायदो?

राणे-राऊत वाद रंगलो, कोणाक होतलो फायदो?

Subscribe

कोकणात शिमग्याक जितकी बोंब मारुची हा तितकी मारून झाली हा…पण आता शिमग्याची बोंब संपली असली तरी सध्या राजकीय बोंब मात्र सुरू हा…त्याचा कारण हाच तसा… रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना अशी राजकीय लढत पहायला मिळत असून, सध्याच्या घडीला नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जरी प्रचारात आघाडी घेतली असली तरी याचे मतात किती परिवर्तन होणार याचे उत्तर निकालानंतर कळेल. सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक टीका सुरू असून, एकमेकांवर होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांमुळे कोकणातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमध्ये महत्वाचे विकासाचे मुद्दे दूर राहिले की काय असाच प्रश्न आता कोकणातील मतदारांना पडू लागला आहे.

2014 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा दीड लाख मतांनी पराभव करत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राखला. त्यामुळे 2014 च्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राणे पिता-पुत्र जोरदार कामाला लागले आहेत. नारायण राणे, नितेश राणे सिंधुदुर्गात तर निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यात तळ ठोकून बसले आहेत. प्रत्येक गावात, तालुक्यात राणे पिता पुत्र जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कोकणात शिवसेना आणि स्वाभिमानच्या आरोपांनी वातावरण तापले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोकणात खंबाटाच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेत विनायक राऊत यांच्यावर टीका केल्याने याचा फायदा आता राणे पिता पुत्र घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

शिवसेनेच्याही गावागावात सभा

एकीकडे राणे पिता पुत्र सभांमधून शिवसेनेवर टीका करत असताना शिवसेनेचे नेतेही त्याच तोडीच्या सभा घेत असून, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत हे रत्नागिरीमध्ये सभा घेऊन राणेंवर प्रहार करत आहेत. उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आली असून, उद्धव ठाकरेंच्या दोन्ही सभांचा राऊत यांना फायदा होणार असे बोलले जात आहे. तसेच कोकणात असलेल्या मुंबईच्या मतदारासोबत शिवसेनेच्या बैठका सुरू असून, याचा देखील फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अशी आहे दोन्ही पक्षांची ताकद –

कुडाळ मालवण मतदारसंघात स्वाभिमान आणि शिवसेनेची ताकद समान असून, सावंतवाडीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. रत्नागिरीमध्ये दहा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. तसेच आमदार उदय सामंत यांचा या मतदारसंघात दबदबा असून, त्यांनी निलेश राणे यांना आव्हान दिले आहे. मात्र निलेश राणे हे देखील या मतदारसंघात बैठका घेऊन तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना गुप्तपणे भेटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या मदतीची शक्यता

नारायण राणे आणि सुनील तटकरे यांची मैत्री असल्याने गुहागर चिपळूणमध्ये जरी भास्कर जाधव निलेश राणे यांना मदत करण्याची शक्यता नसली तरी शेखर निकम राणेंना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर शेखर निकम यांनी मदत केली तर राणेंना त्याचा थोड्याफार प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर युती होऊनही अजून भाजप आणि शिवसेनेत मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे जर या भाजपच्या नेत्यांनी छुपी राणेंना मदत केली तर राऊत यांना थोड्याफार प्रमाणात फटका बसू शकतो.

मतदारसंघातील आमदार

कणकवली-वैभववाडी : नितेश राणे ( काँग्रेस)
कुडाळ – मालवण : वैभव नाईक
सावंतवाडी -वेंगुर्ले : दीपक केसरकर ( शिवसेना)
रत्नागिरी : उदय सामंत ( शिवसेना)
राजापूर- लांजा : राजन साळवी
चिपळूण – संगमेश्वर : सदानंद चव्हाण (शिवसेना)

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न –

औद्योगिकरणाचा अभाव, बेरोजगारी

पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

मच्छिमारांची नाराजी

रखडलेले प्रकल्प

चौपदरीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -