ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत; पण आज ११० जणांचा मृत्यू

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. मात्र तरिही आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ११० एवढी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होत असले तरी त्याची तीव्रता तेवढीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच आज दिवसभरात राज्यात ५ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज ८ हजार २३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.