घरताज्या घडामोडीचारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून; आरोपी पोलिसात हजर

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून; आरोपी पोलिसात हजर

Subscribe

पत्नीचा निर्घृण खून करुन पती पोलीस ठाण्यात हजर झाला.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करत तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीविरोधात राहाता पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे येथे हा प्रकार घडला असून घटनेनंतर आराेपी पती स्वत: पोलिसांत हजर झाल्याने या खून प्रकरणाचा उलगडा झाला. सुनील जनार्दन लेंडे असे खुनी पतीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता पत्नी छाया हिला घेऊन सुनील शेतात घास कापण्याच्या बहाण्याने घेऊन गेला होता. शेतात घास कापत असताना बेसावध असलेल्या छायाच्या डोक्यात पाठीमागून सुनीलने लाकडी दांड्याचा प्रहार करत तिचा खून केला आणि मृतदेह शेतातच टाकून देत घर गाठले.

घरी येत त्याने आई-वडीलांना रुई येथील पाहुणा मृत झाल्याचे सांगत मुलांना घेऊन तेथे जाण्यास सांगितले. स्वत: पाठीमागून येतो, असे सांगत त्यांना पाठवून दिले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा शेतात जेथे पत्नीचा मृतदेह टाकला होता तेथे गेला. यावेळी त्याने सोबत पेट्रोल आणि रिकामी गोणी नेली होती. उशिराने पत्नीचा मृतदेह पोत्यात टाकून घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतर दूर जात तेथे पोत्यातील मृतदेह पेट्रोलच्या साहाय्याने पेटवून दिला.

- Advertisement -

त्यानंतर काही वेळातच आरोपीने पोलीस ठाण्यात येत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात खात्री केली असता तेथे आरोपीच्या पत्नीचा मृतदेह जळत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात पाठविला. आरोपी सुनील विरोधात छायाचा भाऊ सुनील तरस याने फिर्याद दिली. फिर्यादीत त्याने पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन वाद सुरू असल्याचे म्हटले आहे. या दांम्पत्याला तीन मुले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -