घरमहाराष्ट्ररामदास आठवले म्हणतात, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही

रामदास आठवले म्हणतात, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही

Subscribe

मराठा आरक्षणाला आरपीआयचा पुर्ण पाठिंबा आहे. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. काल खोपोली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्याचबरोबर राम मंदिर, आंबेडकर आणि ओवेसी यांची वंचित आघाडीबद्दलही त्यांनी त्यांची मते व्यक्त केली.

मराठा आरक्षणासंबंधी आपली भूमिका मांडताना आठवले म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच. मात्र हे आरक्षण टिकवायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल आणि तसा कायदा करावा लागेल. तरच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असे आठवले म्हणाले. मराठा समाज मागास आहे, हे मान्य झाले तरी एकूण आरक्षणाच्या मर्यादेमुळे सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकेल की नाही? याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांनी आठवले यांना देशात सध्या गाजत असलेल्या राम मंदिर प्रश्नावरही बोलते केले. यावर आठवले म्हणाले की, मंदिर आणि पुतळे बांधली नाहीत तर मग मते कशी मिळणार? राम मंदिर व्हावे, ही भारतातील अनेकांची इच्छा असली तरी विवादित जागेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत काहीच होणार नाही. रा मंदिरामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये, याचीही काळजी सरकारला घ्यावी लागेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -