घरताज्या घडामोडीमुंबईच्या कारचालकाने मोडला नियम; दंड कोरोनाबाधित नाशिककराला

मुंबईच्या कारचालकाने मोडला नियम; दंड कोरोनाबाधित नाशिककराला

Subscribe

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी ते हाताळताना लहान चूकही निर्दोष व्यक्तीला कशी महागात पडते, याची प्रचिती नाशिक महानगरातील एका महिलेला आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्याच एका कोरोनाबाधित व्यक्तीला असाच मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेत वाहतूक पोलिसांनी ई-चलन प्रणालीत एमएच-04 ऐवजी 15 क्रमांक टाईप केल्याने स्वतःची कार पार्किंगमधूनही न काढताही या व्यक्तीला २०० रुपये दंडाचा मेसेज आला. या मेसेजमुळे गोंधळलेल्या व्यक्तीने चौकशी केल्यावर हा प्रकार पुढे आला.

बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलन प्रणालीव्दारे राज्यभरातील वाहतूक पोलीस कडक कारवाई करत असताना सोमवारी (दि.27) ही घटना घडली. ई-चलन प्रणालीत एखाद्या वाहनचालकाने राज्यात कुठेही नियम मोडले तरी त्याची नोंद होऊन कारवाईची प्रक्रिया सुरू होते. पावती पुस्तकाऐवजी पोलिसांच्या हाती आधुनिक यंत्र देण्यात आले आहेत. त्याद्वारे गाडीचा फोटो, वाहन क्रमांक, परवाना क्रमांक व इतर माहिती टाकल्यावर ई-चलन तयार होते. हे चलन वाहनचालकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवले जाते. मात्र, स्मार्ट तंत्रज्ञान हाताळताना चूक झाल्यास निर्दोष व्यक्तीलाचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, हेदेखील यातून पुढे आले.

- Advertisement -

सोमवारी (दि.27) दुपारी 12.30 वाजेदरम्यान मुंबई पासिंग असलेली कार संबंधित वाहनचालकाने नो-पार्किंगमध्ये पार्क केल्याचे वाहतूक पोलिसांना दिसले. कारच्या क्रमांकानुसार पोलिसांनी ई-चलनाव्दारे २०० रूपये दंडाचा मेसेज कारमालकाच्या मोबाईल क्रमांकावर पाठवला. मात्र, पोलिसांकडून एमएच-०४ टाईप करण्याऐवजी एमएच-१५ टाईप केले गेले. एमएच-१५ च्या कारमालकाने आपला मोबाईल क्रमांक वाहन प्रणालीत लिंक केला होता. त्यामुळे एमएच-१५ च्या कारमालकाला दंडाचा मेसेज आला. या प्रकारामुळे संबंधित कारमालक चांगलाच गोंधळला. कारण, त्यांची कार १५ दिवसांपासून बिल्डिंगच्या पार्किंगमधून बाहेर काढली नसतानाही दंडाचा मेसेज आला कसा, याबाबत मालकाने महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या संकेतवर ई-चलन क्रमांक टाकून पाहणी केली. त्यात पुरावा म्हणून कारचा फोटो पाहिला असता कारचा क्रमांक एमएच ०४ असल्याचे दिसून आले. त्यातून ई-चलन प्रणाली वापरकर्त्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, नियम मोडला मुंबईकराने आणि दंडाची पावती नाशिककर व्यक्तीला आल्याने मनस्ताप सहन झाला.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -