नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरण : ATSचं आरोपपत्र दाखल

नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणामध्ये आता दहशतवाद विरोधी पथकानं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरसह, श्रीकांत पांगरकरसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Pune
Nalasopara Weapon Case: ATS arrested a ‘Well-Known’ connection from WB
संग्रहित छायाचित्र

नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणामध्ये आता दहशतवाद विरोधी पथकानं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरसह, श्रीकांत पांगरकरसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनआयए कोर्टात ६ हजार ८४२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विस्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा तसेच दहशतवादी कारवायांच्या विरोधी असलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीसह अन्य संस्थांचा संबंध आहे असं देखील एसआयटीनं म्हटलं आहे.

८ ऑगस्ट रोजी नालासापाऱ्यातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर  एटीएसच्या हाती काही शस्त्रास्त्र देखील लागली होती. यावेळी पोलिसांनी गावठी बॉम्ब, काडतुसं देखील जप्त केली होती. तसेच वैभव राऊतला अटक केल्यानंतर सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर देखील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान, या चौघांसह ATSनं आणखी १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. चौकशीअंती अनेक धक्कादायक खुलासे यावेळी चौकशी दरम्यान करण्यात आले आहेत.

वाचा – नालासोपारा स्फोटक प्रकरण; आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here