घरमहाराष्ट्रकांद्याची निर्यात वाढण्यासाठी नवे धोरण आखले - पंतप्रधान मोदींचे स्पष्टीकरण

कांद्याची निर्यात वाढण्यासाठी नवे धोरण आखले – पंतप्रधान मोदींचे स्पष्टीकरण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमधील पिंपळगाव येथे सभा झाली. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांना मोदी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यामुळे मोदी आज जे भाषण करतील त्याचा परिणाम उद्याच्या मतदानावर होईल, असे बोलले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे – 

  • पहिल्या दोन टप्प्यातील मतदानामुळे देशभरातून जी माहिती मिळत आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
  • मी पंतप्रधान झालो तेव्हा विरोधक म्हणाले की हा काय आंतरराष्ट्रीय धोरण आखणार. तेव्हा मी म्हणालो होतो की, “हम ना आँख झुकाकर बात करेंगे, ना आँक उठाकर बात करेंगे, हम आँख मे आँख डालकर बात करेंगे” आणि आज जगातील सर्व देशांसोबत मी अधिकारवाणीने बोलू शकतोय.
  • देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल स्कूल स्थापन केल्या जात आहेत. आदिवसींच्या हातात पैसा जावा यासाठी वनातील उत्पादनांना चांगला दर मिळवून दिला जात आहे.
  • नाशिकच्या कांद्याची निर्यात व्हावी यासाठी आम्ही अनेक सूट दिलेल्या आहेत.
  • नाशिकमधील आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मला भेटायला आले होते, त्यांनी सूचवलेल्या सर्व मागण्या मी मान्य केल्या आहेत.
  • नदीच्या पाण्याला घेऊन लोकांना संभ्रमित केले जात आहे. मी या परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की, इथल्या स्थानिक लोकांच्या इच्छेविरोधात कोणतेही काम होणार नाही. HAL बाबतही काँग्रेसकडून अफवा पसरवली जात आहे. HAL ला मातीत घालण्याचे काम काँग्रेसने केले होते. आम्ही तर एचएएलला ताकद दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -