Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पोलिसांकडून १२ लाखांचा मुद्देमाल परत

पोलिसांकडून १२ लाखांचा मुद्देमाल परत

Related Story

- Advertisement -

नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लुटलेला ऐवज जप्त करुन तो गुरुवारी (दि.७) मूळ मालकांना परत केला. पोलिसांनी सुमारे १२ लाख १० हजार ६०७ रुपये किंमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला.

महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन सप्ताहनिमित्त गुरुवारी (दि.७) पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलीस दलातर्फे फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणेनिहाय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल मूळ मालकांना प्रदान करण्यात आला. चोरीस गेलेले सोने व चांदीचे दागिने, वाहने, मोबाईल, रोख रक्कमेसह इतर मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी निफाड विभाग सोमनाथ तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

दर महिना आढावा घेत मुद्देमाल वाटप करा

- Advertisement -

पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेला प्रलंबित मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने संबंधित तक्रारदारांना दर महिन्याचा आढावा घेवून वाटप करण्यात यावा. बेवारसरित्या मिळून आलेल्या मुद्देमालाचा तात्काळ निपटारा करावा, अशी सूचना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलिसांना दिल्या.

बाहेरगावी जाताना काळजी घ्या

नागरिकांनी बाहेरगावी जाताना दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. दागिने, पैसे बँकेत ठेवावेत. बाहेरगावी जाताना शेजारच्यांना कल्पना द्यावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मालमत्तेच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisement -