Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona : दिवसभरात ४४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, 493 कोरोनामुक्त

Corona : दिवसभरात ४४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, 493 कोरोनामुक्त

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि.२६) दिवसभरात ४४१ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 141, नाशिक शहर 280, मालेगाव 13 आणि जिल्हा बाहेरील सात रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ३ आणि नाशिक ग्रामीणमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार ७०५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १ हजार ९३, नाशिक शहर १ हजार ४८८, मालेगाव ९९ आणि जिल्ह्याबाहेरील २५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजअखेर ९९ हजार ८२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २८ हजार ७९९, नाशिक शहर ६५ हजार 914, मालेगाव ४ हजार २९३ आणि जिल्ह्याबाहेरील ८१६ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी ९५ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २७ हजार ४३, नाशिक शहर ६३ हजार ५२४, मालेगाव ४ हजार २३ आणि जिल्ह्याबाहेरील ७४९ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -