घरमहाराष्ट्रनाशिक६५ दुचाकी हस्तगत : वाहनमालकांना संपर्काचे आवाहन

६५ दुचाकी हस्तगत : वाहनमालकांना संपर्काचे आवाहन

Subscribe

भद्रकाली पोलिसांनी वाहन चोरट्यांकडून तब्बल ६५ दुचाकी हस्तगत केल्या, मूळ मालकांनी कागदपत्रांसह ओळख पटवत दुचाकी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून परत घेऊन जाण्याचे आवाहन

नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असल्याने दुचाकीमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुचाकी चोरी झाल्यानंतर परत कधी सापडणारच नाही, असे समजून वाहनमालक विषय सोडून देत आहेत. मात्र, भद्रकाली पोलिसांनी कसून तपास करत दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्यांकडून तब्बल ६५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मूळ मालकांनी कागदपत्रांसह ओळख पटवत दुचाकी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून परत घेऊन जावी, असे आवाहन भद्रकाली पोलिसांनी केले आहे.

भद्रकाली पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात सापळा रचला असता दुचाकी चोरट्यांनी पोलिसांना तब्बल ६५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरट्यांनी दुचाकीच्या नंबरमध्ये फेरफार करत दुचाकी विक्री केल्या होत्या. गंगामाता वाहन शोध संस्थेने नंबर व चेसी नंबरच्या आधारे दुचाकी मालकांचा शोध लावला आहे. ६५ दुचाकी भद्रकाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेल्या आहेत. मूळ मालकांनी कागदपत्रांसह ओळख पटवत दुचाकी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून परत घेऊन जाव्यात, असे आवाहन भद्रकाली पोलिसांनी केले आहे. गंगापूर पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केल्यानंतर दुचाकी चोरीची मोठी साखळी उघडकीस आली आहे. गंगामाता संस्थेच्या वतीने दुचाकी मालकांचा शोध लावण्याचे काम सुरु आहे. अनेक मूळ मालकांचा शोध लागला आहे. दुचाकी सापडल्याने अनेक वाहनमालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -