घरमहाराष्ट्रनाशिक‘आपलं महानगर’चा दणका; अंबोली फाटा ते वाघेरा रस्त्याचे काम सुरू

‘आपलं महानगर’चा दणका; अंबोली फाटा ते वाघेरा रस्त्याचे काम सुरू

Subscribe

नागरिकांनी व्यक्त केले समाधान

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातून महाराष्ट्र – गुजरात राज्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग असलेला अंबोली फाटा ते वाघेरा रस्ता मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ असणारा रस्ता खड्ड्यांमध्ये हरवल्याने ‘अंबोली फाटा ते वाघेरा रस्ता हरवलाय खड्ड्यांत’ या आशयाचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये शनिवारी (दि.५) प्रकाशित होताच या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत दैनिक ‘आपलं महानगर’चे आभार मानले.

त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व वाहनधारकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र, या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खडेमय बनला झाला आहे. रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणे मुश्किल होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसूल भागातून तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागते आहे. दोन-दोन वर्षाला नवीन टेंडर काढूनदेखील रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने या रस्त्याची चौकशी होणार का, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. पावसापूर्वी बांधकाम विभागाकडून प्रत्येक वर्षी मलमपट्टी करत असतात. मात्र, निकृष्ठ कामाने वाहनधारक व प्रवाशांची जीवघेणी ठरत आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्या दर्जाचे काम करावे, झालेली दुरवस्था थांबवावी, अन्यथा तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी

वृत्त प्रसिद्ध होताच रस्त्यावर पुन्हा मलमपट्टी सुरूवात झाली. मात्र, सार्वजनिक विभागाने कामाचा दर्जा चांगला ठेवुन काम करणे आवश्यक आहे. दरवर्षी प्रमाणे थोडी मलमपट्टी करून तोंडाला पाने पुसली जातात. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, जेणेकरून रस्त्याचे कामे सुरुवातीस दर्जाहीन निकृष्ट होणार नाही.

– समाधान बोडके-पाटील, शिवसेना तालुका समनव्यक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -