घरमहाराष्ट्रनाशिककॅलिफोर्नियातील आरा द्राक्षाचे वाण रुजणार नाशिकच्या मातीत

कॅलिफोर्नियातील आरा द्राक्षाचे वाण रुजणार नाशिकच्या मातीत

Subscribe

निर्यातीला बळकटी, उत्पादकतेत वाढ; सह्याद्री फार्म्सला वाण विक्रीचे अधिकार

अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च, निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभर दबदबा असलेले कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण नाशिकच्या शेतकर्‍यांच्या दारात आले आहे. मागील दोन वर्षांपासून ‘सह्याद्री फार्म्स’ने यशस्वी चाचणी केलेल्या या वाणाचे भारतातील विक्रीचे सर्वाधिकार त्यांना मिळाले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना जागतिक स्पर्धेेतील स्थान भक्कम करण्यास मदत होणार आहे.

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य ज्युपिटर या ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनीने ‘आरा’चे सर्वाधिकार सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला प्रदान केले आहेत. ‘ज्युपिटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क ट्विडल यांच्या उपस्थितीत मोहाडी (ता. दिंडोरी) येथे सह्याद्री फार्म्सच्या मुख्यालयात नुकत्याच या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. एखाद्या फळपिकाच्या जागतिक व्हरायटीचे देशातील सर्वाधिकार मिळवणारी ‘सह्याद्री’ देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. ‘सह्याद्री’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी बुधवारी (दि. 3 ) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यावेळी संचालक श्रीराम ढोकरे, रवींद्र बोराडे आणि अझहर तंबुवाला उपस्थित होते.

- Advertisement -

हि आहे ‘आरा’ची वैशिष्टे

  • सहा खंडांमधील २४ देशांत उत्पादन
  • जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक मागणी
  • व्हाईट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत.
  • साखर-अ‍ॅसिडचे उत्तम संतुलन (१९ ते २० ब्रिक्स)
  • संजीवकांच्या कमी वापरामुळेे उत्पादनखर्चात घट
  • मण्याचा आकार २२ ते ४२ मिमी.
  • अत्यंत उपजाऊ जाती, मोठा व टिकाऊ घड
  • पाऊस व प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम
  • उष्णकटिबंधीय तसेच वाळवंटी प्रदेशातही योग्य
  • हेक्टरी २७ ते ३५ टनांपर्यंत उत्पादकता
  • रंगीत, अत्यंत देखण्या व टिकाऊ रंग
  • खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर, उत्तम चव
  • उत्तम टिकवणक्षमता

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -