घरमहाराष्ट्रनाशिकलघु पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्याला ३० हजारांची लाच घेताना अटक

लघु पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्याला ३० हजारांची लाच घेताना अटक

Subscribe

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पुणेगाव कालवा प्रकल्पात गेलेल्या जमीनीची नुकसान भरपाई देण्यापोटी तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच घेणार्‍या लघु पाटबंधारे विभागातील उप अभियंता तथा प्रकल्प अधिकारी राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांना अँटी करप्शनच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने बुधवारी (१७ जुलै) रंगेहाथ अटक केली.

त्र्यंबकरोडवरील सिंचन भवन परिसरातील पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने पंचांसमक्ष ही कारवाई केली. तक्रारदाराची वडाळी भोई येथे शेतजमीन असून, त्यातील ६४ आर क्षेत्र हे पुणेगाव कालवा प्रकल्पात गेले आहे. या जमिनीची भरपाई म्हणून तक्रारदाराला शासनाकडून ५१ लाख मंजूर झाला. तो धनादेश देण्यासाठी शिरवाडकर यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार हा सापळा रचण्यात आला. शिरवाडकर यांनी आपल्या कार्यालयातच पंचांसमक्ष ही लाच स्विकारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -