घरमहाराष्ट्रनाशिकसराफ दुकाने फोडणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

सराफ दुकाने फोडणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

Subscribe

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सराफ दुकानातून सोने-चांदीची तिजोरी लंपास करणार्‍या दोन चोरट्यांना बुलढाणा, धुळे आणि एकाला पुणे जिल्ह्यातून अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी चांदीचे दागिने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून नाशिक जिल्ह्यातील आणखीने घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, उल्हासनगरमधील चोरट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.


हेही वाचा – पुणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

- Advertisement -

 

काय आहे नेमके प्रकरण?

६ नोव्हेंबर रोजी अभोणा (ता.कळवण) येथील सराफ व्यापारी उमेश गणपत दुसाणे यांच्या माउली ज्वेलर्स दुकानाचे सेफ्टीगेट चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. दुकानातील तिजोरीसह सुमारे ३ लाख ६५ हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानुसार ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. आरोपींनी तोंडाला रुमाल आणि मास्क लावल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. तपासादरम्यान चोरी झालेली तिजोरी नांदगाव ते शिउर बंगला सीमेवर तळवड गाव शिवारात फोडलेल्या अवस्थेत आढळून आली.

- Advertisement -
an inter district thief gang arrested who theft saraf shops
चोरट्यांकडून पोलिसांनी चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

पोलीस पथकाने असा लावला चोरट्यांचा शोध

चोरट्यांनी चोरी करताना बोलेरो वापरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याआधारे सीसीटीव्ही फुटेजवरुन पथक बुलढाणा आणि जालना जिल्ह्यात गेले. चोरटे देऊळगाव राजा परिसरात असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचत अजयसिंग बावरी याला अटक केली. त्याच्या दुसरा साथीदार मुकींदरसिंग टाक याला पोलिसांनी धुळे ते मालेगाव परिसरातून ताब्यात घेतले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवला असता रामसिंग भोंड, पंकजसिंग दुधाणी, राजा याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रामसिंग भोंडला लोणी काळभोर (जि.पुणे) येथून अटक केली. पंकजसिंग दुधाणी, राजा (पूर्ण नाव समजू शकले नाही) रामसिंग भोंडकडून (रा.उल्हासनगर, जि. ठाणे) चांदीचे दागिने जप्त केले आहेत. उल्हासनगरमधील चोरट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे रवाना झाले आहे.


हेही वाचा – बनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


अटक झालेले चोरटे

टोळीचा म्होरक्या अजयसिंग ऊर्फ सतनामसिंग चंदासिंग बावरी (३५, रा. दुर्गापूर वार्ड, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा), मुकींदरसिंग निक्कासिंग टाक (३२, रा, बीबी, ता.लोणार, जि.बुलढाणा), रामसिंग धन्नासिंग भोंड (२८, रा. गंजमाळ, नाशिक) अशी पथकाने अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

चोरटे सराईत गुन्हेगार

स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले संशयित चोरटे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर बुलढाणा, पुणे, औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, घरफोडीसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून नाशिक जिल्ह्यातील आणखीने घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अशी केली सराफ, किराणा चोरी

अजयसिंग बावरी याने नाशिक व उल्हासनगरमधील साथीदारांना ६ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री व्दारका परिसरात बोलावले. पंकजसिंग याने उल्हासनगरहून बोलेरो गाडी आणली. व्दारका येथून सर्वजण बोलेरो गाडीतून वणी-सापुतारा रोडने अभोणा व कनाशी गावात सराफ व किराणा दुकाने फोडून चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी एकमेकांमध्ये चोरीच्या मुद्देमालाचे वाटप केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -