घरताज्या घडामोडीचिंताजनक : नाशकात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण

चिंताजनक : नाशकात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण

Subscribe

रक्ताचे अहवाल आले पॉझिटिव्ह; जिल्हा प्रशासनास हादरा

लासलगाव येथील करोना बाधित रुग्ण बरा होण्याच्या मार्गावर असतानाच नाशिक शहरातील दुसर्‍या एका ४४ वर्षीय रुग्णाचे रिपोर्ट सोमवारी (दि. ६) करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. हा रुग्ण नाशिक शहरातील मनोहरनगर परिसरातील रहिवासी आहे. या रुग्णावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराच्या परिसरातील नागरिकांचे साथरोग सर्व्हेक्षण आरोग्य पथकामार्फत केले जात आहे. या सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, हात नाक, तोंड व डोळे यांना लावू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, २९ मार्च रोजी लासलगाव येथील ३० वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालावरुन निष्पन्न झाले. त्यास आठ दिवस होत नाही तोच नाशिकमध्ये सोमवारी (दि.६) दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तो आग्रा येथे रेल्वेच्या कॉन्ट्रक्टच्या संदर्भात गेला होता.

- Advertisement -

पथकाने घरी जावून रुग्णास घेतले होते ताब्यात

नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार महापालिकेच्या आरोग्य पथक व पोलीस पथकाने त्या रुग्णाच्या घरी जावून त्यास उपचारार्थ शनिवारी (दि.४) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.

३० रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सोमवारी ३१ रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात ३० निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आढळला. सोमवारी करोना आजाराची लक्षणे दिसल्याने उपचारासाठी नव्याने पाच संशयित रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

- Advertisement -

दिल्लीहून प्रवास करुन आलेल्यांनी साधावा संपर्क

दिल्लीकडून प्रवास करुन नाशिक जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा. बाहेरुन येणार्‍या नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये. संशयित रुग्णांवर लवकरात उपचार करुन तपासणी करता येईल. त्यामुळे कोरोनाला आटकाव करता येईल.
सूरज मांढरे जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -