मंत्रालयाच्या नावाने ६० लाखांना चुना

एमआयडीसीत प्लॉटच्या आमिषाने फसवणूक; एकावर गुन्हा

Nashik
Cheating

शहरात फ्लॅट व प्लॉट विक्रीच्या आमिषाने ग्राहकांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अंबड एमआयडीसीतील प्लॉट मंत्रालयातून मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत ६० लाखांना चुना लावल्याचा प्रकार अंबड येथे घडला आहे. प्लॉट नावावर न करून दिल्याने फसवणुकीची तक्रार संबंधित ग्राहकाने अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

रमेश राजाराम कुलकर्णी (५०, रा. राहता, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे, तर राजेंद्र भास्करराव बोरसे (वय ५०, रा. अंबड) असे फसवणूक करणार्‍याचे नाव आहे. अंबड एमआयडीसी परिसरात २ हजार चौरस मीटर प्लॉट क्र. एस २६ हा रमेश कुलकर्णी याने राजेंद्र बोरसे यांना मिळवून देतो, असे सांगितले. बोरसे यांना कुलकर्णी यांनी एमआयडीसीचा प्लॉट दाखविला. यासाठी मंत्रालयातून मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ६० लाख रुपये कुलकर्णी याने बोरसेंकडे मागितले. कुलकर्णी हे परिचित असल्याने त्यावर विश्वास ठेवत बोरसे यांनी १ सप्टेंबर २०१७ ते १ जून २०१९ दरम्यान आरटीजीएसद्वारे १७ लाख व ४३ लाख रोख असे एकूण ६० लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर प्लॉट नावावर होण्यासाठी बोरसेंनी कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांना कुलकर्णी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यातून फसवणूक होत असल्याचे बोरसे यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here