घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या रस्त्यांवर मोदी करताहेत सेनेचा प्रचार

नाशिकच्या रस्त्यांवर मोदी करताहेत सेनेचा प्रचार

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक आणि धुळ्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत अवतरलेले प्रती मोदी अर्थात विकास महंते यांच्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक आणि धुळ्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत अवतरलेले प्रती मोदी अर्थात विकास महंते यांच्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. हे महोदय नेमके कोण आहेत, ते मोदींच्या पेहरावात का असतात आणि त्यांचे उद्दिष्ट काय असावे याबाबत अनेकांना औत्सुक्य आहे. ‘आपलं महानगर’ने महंते यांच्याशी संपर्क साधत या प्रश्नांचा उलगडा केला.

सर्वच पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारक मैदानात उतरवण्यात आले आहेत. भाजपने थेट हुबेहूब मोदींसारखे दिसणारे विकास महंते यांना मैदानात उतरवले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसेच नाशिक लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार रॅलीसाठी महंते आवर्जुन उपस्थित होते. महंते म्हणाले, भाजपसोबत आधीपासूनच जोडला गेलो आहे. २०१४ च्या गुजरात राज्यातील निवडणुकीत आपण प्रचारात उतरलो. त्यानंतर सातत्याने देशभरात प्रचार सभा रॅलीत सहभागी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचे असलेले प्रेम मी अनुभवतो. त्यामुळे भारावून गेलो आहे. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत मला फारच प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे प्रतिमोदी म्हणून मला तरी देशात मागच्या लोकसभेला निर्माण झालेली मोदी लाट अजून ओसरलेली नाही, असेच वाटते. मी हुबेहूब नरेंद्र मोदींसारखा दिसतो, म्हणून भाजपच्या रॅलींमध्ये मला बोलावले जाते. शेकडो कार्यकर्ते सेल्फी घेतात, मानही देतात. पण हे माझ्या प्रसिद्धीसाठी अजिबातच नाही. योग्य उमेदवाराच्या निवडीला आपलाही हातभार लागावा, असा हेतू यामागे आहे. खोटा चेहरा घेऊन वावरणे चुकीचेच आहे. त्यामुळे मला खोटा चेहरा लावणे मनापासून आवडत नाही. पण, लोक जेव्हा मोदी म्हणून दाद देतात तेव्हा आपण काही वावगे करत नाही, असे मनोमन वाटते. अर्थात यामागे माझा व्यावसायिक हेतू नसून योग्य उमेदवार निवडून यावा, हे एक समाजकार्य आहे, त्यात आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे महंते यांनी सांगितले.

- Advertisement -

डझनभर ड्रेस

’प्रतिमोदी’ अशी ओळख बनलेले मुंबईचे उद्योजक विकास महंते सध्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभांत अत्यंत व्यग्र आहेत. ते म्हणतात की, मुंबईबाहेर जायचे असेल तरच मानधन घेतो. उन्हातान्हात प्रचार करावा लागत असल्याने कपडे मळतात. घामही खूप येतो. त्यामुळे मी डझनभर मोदी ड्रेस शिवून घेतले आहे. पूर्वी मी मेकअपमॅन ठेवला होता. पण आता माझा मेकअप मीच करतो.

चित्रपट कलाकार

मुंबईतील उद्योजक विकास महंते यांनी हॅपी न्यू इयर, मोदी काका का गांव, गुज्जूभाई द मोस्ट वाँटेड या चित्रपटात भूमिका केल्यात. विद्या बालन यांच्या ’मिशन मंगल’मध्येही त्यांनी भूमिका केली आहे. आजकाल अनेक रिअ‍ॅलिटी शोमधूनही बोलावणे येत असल्याचे ते सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -