घरमहाराष्ट्रनाशिकमित्रानेच केला मित्राचा खून

मित्रानेच केला मित्राचा खून

Subscribe

चांदवड बसस्थानकात बुधवारी (१७ एप्रिल) दुपारी सद्दाम फारुख शेख (वय २५) याच्यावर धारदार हत्याराने छाती तसेच पोटात वार करण्यात आले. त्यास उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मूत्यू झाल्याचे सांगितले.

चांदवड बसस्थानकात बुधवारी (१७ एप्रिल) दुपारी सद्दाम फारुख शेख (वय २५) याच्यावर धारदार हत्याराने छाती तसेच पोटात वार करण्यात आले. त्यास उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मूत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, मयत सद्दामचा मोठा भाऊ इम्रान शेखने दिलेल्या फिर्यादीनुसार सद्दामचा मित्र प्रेम पवार (रा. आडगाव, ता.चांदवड) याने तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे म्हटले आहे.

मयत सद्दाम फारुख शेख (रा. नाईकवाडा पुरा, चांदवड) हा स्वताची मालवाहू पिकअप वाहन चालवत होता. त्याचा मित्र प्रेम निवृत्ती पवार या दोघामध्ये बस स्थानकावरील रसवंती गृहासमोर अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून पवार याने त्याच्या जवळील तीक्ष्ण हत्याराने सद्दामच्या छाती तसेच पोटात वार केले. सद्दाम रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. तिथे जमलेल्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भाऊ इम्रान यास मोबाईलवर संपर्क करीत माहिती देण्यात आली. उपचार सुरू असताना सद्दाम मयत पावला. प्रेम पवार या गर्दीतून पसार झाला. दरम्यान, इम्रानच्या मित्रांने त्यास दिलेल्या माहिती वरून मयत सद्दाम सकाळ पासून पल्सर मोटारसायकलवर मित्र प्रेम पवार सोबत फिरत होता. यावेळी इम्रानने प्रेम पवारच्या मोबाईलवर वरून फोन करत सद्दामला का मारले, अशी विचारणा केली असता प्रेम यांनी तू त्यालाच विचार, असे सांगत फोन कट केला, अशी फिर्याद मयत सद्दामचा मोठा भाऊ इम्रान शेख याने चांदवड पोलिसात दिली. फिर्यादीनुसार चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रागसुधा आर यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -