घरताज्या घडामोडीलासलगाव जळीतप्रकरण : मुख्य संशयितास पोलीस कोठडी

लासलगाव जळीतप्रकरण : मुख्य संशयितास पोलीस कोठडी

Subscribe

महिला जळीतकांडप्रकरणी मुख्य संशयित रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस. बी. काळे यांच्या समोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी सोमवारी (दि.१७) दुपारी न्यायालयासमोर हजर केले. सरकारी वकील राजीव तडवी यांनी पिडितेची प्रकृती चिंताजनक असून, संशयिताकडून लासलगाव तसेच विविध ठिकाणी तपास करणे आवश्यक आहे. यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने सदर घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली आहे. यामुळे पिडितेचे काहीही म्हणणे असू शकते. तरी शासकीय यंत्रणेने 326 नुसार कलम लावावे, असे निर्देश दिले. संशयिताच्यावतीने अ‍ॅड. उत्तम कदम यांनी बाजु मांडली. निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डींनी सकाळी तपासाचा आढावा घेत काही सूचना केल्याचे समजते. तसेच सदर पिडिता मुंबई येथील मसीना रूग्णालयात उपचार घेत असुन तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -