घरमहाराष्ट्रनाशिकलासलगाव पाणीप्रश्नी पालकमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

लासलगाव पाणीप्रश्नी पालकमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

Subscribe

‘आपलं महानगर’ IMPACT : लासलगावच्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या नव्या आराखड्याला मंत्रालय स्तरावरून लवकच मंजुरी

राकेश बोरा : लासलगाव

लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी १६ गाव पाणीयोजना पुन्हा नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून लासलगावकरांचा घसा कोरडा पडलाय. याबाबत ‘आपलं महानगर’ने ‘तीस इंच पाऊस होऊनही लासलगावकर तहानलेलेच’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तत्काळ बैठक बोलावत पाणीप्रश्नी अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच पंधरा कोटींचा नवीन पाईप लाईन आराखडा मंजूर होत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदेला दुरुस्ती व देखभाल करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

लासलगाव सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत, तसेच सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश भुजबळ यांनी दिली आहेत. भुजबळ फार्म येथे झालेल्या या बैठकीत सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता संजय मिस्त्री, विस्तार अधिकारी एस. के. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, लासलगावचे माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एम. एस. गणेशे, शाखा अभियंता अमोल घुगे, पांडुरंग राऊत, विजय सदाफळ आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागाचे सचिव चहांदे यांसोबत चर्चा

bhujbal saheb

- Advertisement -

यावेळी नव्या आराखड्यास मंजुरी मिळेपर्यंत योजनेच्या पाईपलाईनचे जिल्हा परिषदेमार्फत दुरुस्तीचे आदेश दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत. सोळागाव योजनेची पाईपलाईन 15 ते 20 वर्ष जुनी असलेली पाईपलाईन खराब झाल्याने अनेकदा लिकेजचे प्रश्न निर्माण होत असतात. याबाबत भुजबळ यांनी विधानसभेच्या सभागृहात विषय मांडला होता. त्यानुसार या योजनेसाठी नवीन पाईपलाईन लाईन टाकणे व विजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली होती. एकूण 15 कोटींचा आराखडा मंत्रालयस्तरावर आहे. या संदर्भात बैठकीतूनच दूरध्वनीवरून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजय चहांदे यांसोबत पालकमंत्री भुजबळ चर्चा केली.
पाणीपुरवठ्याची वीज खंडित होऊन अनेक नवनवीन प्रश्न तयार होत असतात. यावर उपाय म्हणून हा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील महावितरणच्या अधिकार्‍यांना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या. तसेच धुळगाव, राजापूर आणि मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत त्यांचेही आराखडे तयार करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -