घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचे आयुक्त गमे म्हणतात, कुणी घर देता का घर?

नाशिकचे आयुक्त गमे म्हणतात, कुणी घर देता का घर?

Subscribe

कुणी घर देतं का मला घर.. नटसम्राटाची ही हाक आता नाशिक महापालिकेचे दस्तुरखुद्द आयुक्त राधाकृष्ण गमे देत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी या निवासस्थानात मार्च महिन्यापर्यंत राहू द्यावे, अशी विनंती तुकाराम मुंढे यांनी शासनाने केली आणि ती मंजुर झाल्याने गमेंची अस्वस्थता वाढली आहे. त्यांनी चक्क नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे धाव घेत याबाबत तक्रार केली आहे. मुंढे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवासस्थान तुर्तास द्यावे असा सल्लाही दिल्याचे समजते.

तुकाराम मुंढे यांची बदली होऊनही बंगला खाली केलेला नाही. गमे यांनी घरगुती सामान खासगी निवासस्थानात हलवले आहे. तातडीने निवासस्थान न मिळाल्यास आपल्याही मुलांची शैक्षणिक अडचण होऊ शकते असे सांगत काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंढे यांची भेट घेतली होती. परंतु तोडगा न निघाल्याने त्यांनी अखेर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. मुंढे यांना शासकीय निवासस्थान हवे असेल तर बांधकाम विभागाच्या मिळकतींमधून अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती गमे यांनी प्रधान सचिवांकडे केल्याचे समजते.

- Advertisement -

बंगल्याला नेहमीच वादाचे कुंपण

महापालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान कोणत्या-ना कोणत्या कारणावरुन नेहमीच चर्चेत राहिले आहे. तत्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांनी या बंगल्यात चक्क गाय बांधून तिची नित्यनेमाने पुजा करण्याची पध्दत रुढ केली होती. शासकीय निवासस्थानात अशा प्रकारे प्रथमच गाय बांधण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर घंंटागाडी कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी या बंगल्यावर मोर्चा काढल्याने तत्कालीन आयुक्तांच्या पत्नीने रौद्ररुप धारण केल्याचेही त्यावेळी सांगितले गेले. तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांची बदली झाल्यानंतर त्यांनीही हा बंगला तातडीने सोडला नव्हता. त्यानंतर आलेले अभिषेक कृष्णा आणि गेडाम यांच्यातील वाद या बंगल्यामुळेच चर्चेत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -