घरमहाराष्ट्रनाशिकआता बस्स... आणखी कुणाच्या घरातला निनाद जाऊ नये : वीरपत्नी विजेता मांडवगणे

आता बस्स… आणखी कुणाच्या घरातला निनाद जाऊ नये : वीरपत्नी विजेता मांडवगणे

Subscribe

निनाद हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील.. तो शहीद झाला असला तरी तो विचार आणि स्मृतींच्या रुपाने आमच्यात आहे. एखाद्या माणसाच्या जाण्याने किती नुकसान होतं, याचा कुणी विचारही केला नसेल. म्हणूनच आम्हाला युद्ध नकोय.

निनाद हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील.. तो शहीद झाला असला तरी तो विचार आणि स्मृतींच्या रुपाने आमच्यात आहे. एखाद्या माणसाच्या जाण्याने किती नुकसान होतं, याचा कुणी विचारही केला नसेल. म्हणूनच आम्हाला युद्ध नकोय. आता बस्स, आणखी कुणाचा निनाद जाऊ नये… अशी अंतर्मुख करणारी प्रतिक्रिया श्रीनगरात शहीद झालेल्या स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी विजेता मांडवगणे यांनी व्यक्त केली.

लखनौ येथून गुरुवारी, २८ फेब्रुवारीला दुपारी नाशिकला परतलेल्या निनाद यांच्या पत्नीसह आई-वडिलांनी माध्यमांसमोर दाटलेल्या विचारांना वाट मोकळी करून दिली. विजेता मांडवगणे यांनी युद्धजन्य परिस्थितीवर ठाम मत व्यक्त करतानाच शांततेचा संदेशही दिला. पती निनाद यांच्याबद्दल त्या म्हणाल्या की, निनाद हा माझे जीवन होता आणि आहे. तो शहीद झाला असला तरी तो आजही आमच्यात आहे, माझ्या तनामनात आहे. निनादसारखा पती कधीच मिळणार नाही. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जाईल. म्हणून आम्हाला युद्ध नकोय, युद्धात न भरु येणारं मोठं नुकसान होतं.

- Advertisement -

जोश फेसबुकवर नको सैन्यात दाखवा

सोशल मीडियावर अतिरंजित आणि भरमसाठ पोस्ट टाकणाऱ्यांबाबत वीरपत्नी विजेता यांनी मोठा रोष व्यक्त केला. फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो, आता हे बंद करा. तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सहभागी व्हा आणि मग अनुभवा हा जोश, अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियाच्या अधीन झालेल्या तरुणाईला संयमाचे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -