घरताज्या घडामोडीमास्क वापरण्यास विरोध ; फार्मसी एजन्सीचालक ताब्यात

मास्क वापरण्यास विरोध ; फार्मसी एजन्सीचालक ताब्यात

Subscribe

करोना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी चौकाचौकात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस करत आहे. तरीही, मास्क वापरण्यास फार्मसी एजन्सीचालकाने विरोध करुन पोलिसांशी हुज्जत घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्भया पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.

शहर निर्भया पथक गस्त घालत असताना त्यांनी एकास मास्क घालण्याचे आवाहन केले. त्यावर संबंधित व्यक्तीने पोलिसांशी हुज्जत घालून गर्दी गोळा केली. तोंडाला मास्क लावून फायदा होत नाही, असा दावा करुन वाद घातला. त्यामुळे निर्भया पथकाच्या नेहा सुर्यवंशी यांनी संबंधीत व्यक्तीस ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -