घरमहाराष्ट्रनाशिकमहाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट

Subscribe

नितीन भोसले : नार -पार प्रकल्प अभ्यास शिबिर

महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंब पाणीही गुजरातला दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री म्हणत असले तरी राज्याचे शासनाचे उपसचिव मात्र लेखी पत्रात नमूद करतात, पार- तापी , नर्मदा गुजरात राज्यातील कच्छ आणि सौराष्ट्र भागातील सिंचनासाठी 1330 द. ल.घ. मी. पाणी वळवण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्यातील 434 द.ल.घ.फूट पाणी तापी खोर्‍यातील उकाई धरणात (गुजरातसाठीच) वळवले जाणार आहे. यावरून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात असून मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री जनतेशी दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी आमदार नितीन भोसले यांनी केला.

नांदगाव तालुका नार-पार जलहक्क समिती आयोजित केलेल्या नार -पार प्रकल्प अभ्यास शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जलहक्क समितीने 14-15 महिने तालुक्याच्या खेडोपाडी चालवलेले जलजागर अभियान महत्वाचे असून समितीने अभियानास तालुक्याच्या पलीकडे नेवून व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज नार-पारचे संपूर्ण पाणीच गुजरातला नेले जात असताना जर मआडातच नसेल तर पोहर्‍यात ते कसे येईंल, याचा दूरवर विचार करून राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन मपाण्यासाठी जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, त्यालाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहनही भोसले यांनी केले. तालुका नार- पार जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष गुप्ता यांनी मनोगत मांडून नार-पारचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी गेल्या 14-15 महिन्याच्या जलजागर अभियानाची माहिती दिली. आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले यांनी प्रास्ताविक केले. मनसेचे योगेश सोनार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर यांचे हस्ते नितीन भोसले यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये भास्कर कदम, गुप्ता लॉन्सचे संचालक राजेंद्र गुप्ता, मनमाड बचावचे पुंडलिक कचरे, योगेश बोदडे, नाशिकचे सचिन मालेगावकर आणि सहकारी, मनसेचे कांती चौबे, भाजपचे काळे, गावोगावचे सरपंच, पत्रकार, सदस्य उपस्थित होते. सुरेश वाघ, रामदास पगारे, दिलीप निकम, शिवाजी जाधव, परशराम शिंदे, नीलेश चव्हाण, सचिन कोल्हे यांनी संयोजन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -